मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई, १३ जानेवारी २०२३ : ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि लेखक तथा मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. भाषा आणि वित्त विभागाकडून अडचणी होत असल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा पत्रामध्ये केला आहे.

गुणवत्ता आणि शिस्तीला प्राधान्य दिल्याचा राग मनात विरून माझी अडवणूक सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. करमणूकप्रधान, उत्सवी पद्धतीच्या उपक्रमांवर उधळपट्टी कशासाठी? अशी विचारणा दीक्षित यांनी केली आहे. तसेच विश्वकोशाचे काम ठप्प ठेवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केल्याचा आरोपही दोन पानी राजीनामा पत्रातून राजा दीक्षित यांनी केला आहे.

मला पदाचा कोणताही मोह नव्हता. पदावर असण्याचा किंवा नसण्याचा मला काही फरक पडणार नाही. माझे लेखन आणि संशोधन, सामाजिक कार्य यापुढे देखील चालूच राहील, असे राजा दीक्षित यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर मराठी भाषा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा