मुंबई, १४ जुलै २०२३ : मारुती सुझुकीकडे सध्या CNG वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. त्यांनी भारतीय बाजारपेठेत १.४ दशलक्ष पेक्षा जास्त S-CNG वाहने विकली आहेत. आता मारुती सुझुकीने भारतीय बाजारात नवीन Fronx क्रॉसओवरची CNG आवृत्ती लाँच केली आहे. Fronx सीएनजी सिग्मा आणि डेल्टा या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
इंजिन पॉवर आणि गिअरबॉक्स-
फ्रँक्स सीएनजीची इंजिन पॉवर 1.2-लिटर, चार-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन आहे. हे 6000 rpm वर 88.50 bhp चे कमाल पॉवर आउटपुट आणि 4,400 rpm वर 113 Nm चे पीक टॉर्क आउटपुट देत आहे. CNG वर चालू असताना, 6,000 rpm वर पॉवर आउटपुट 76 bhp पर्यंत कमी होतो आणि 4,300 rpm वर टॉर्क आउटपुट 98.5Nm पर्यंत कमी होतो. CNG पॉवरट्रेन केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.
केवळ पेट्रोल इंजिन मॉडेलसह, 1.2-लिटर इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स व्यतिरिक्त 5-स्पीड AMT चा पर्याय मिळतो. मारुती सुझुकीने फ्रॉक्ससाठी बलेनो आरएसकडून 1.0-लिटर बूस्टरजेट इंजिन घेतले आहे. हे 98 Bhp ची कमाल पॉवर आणि 148 Nm चे पीक टॉर्क आउटपुट तयार करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
किंमत बदल बोलायचं झाल्यास सिग्मा कारची किंमत ८.४१ लाख रुपये तर डेल्टा कारची किंमत ९.२७ लाख रुपये असणार आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. Frox CNG ही कार 28.51 kmpl चा मायलेज देईल, असा दावा मारुती सुझुकी कंपनीने केला आहे. Maruti Suzuki Fronx CNG नुकत्याच लाँच झालेल्या ह्युंदाई एक्स्टर सीएनजीशी स्पर्धा करेल.
नवीन Fronx सीएनजी लाँच केल्यामुळे, मारुती सुझुकीकडे आता सीएनजी श्रेणीतील पोर्टफोलिओमध्ये १५ मॉडेल्स आहेत. एंट्री-लेव्हल सिग्मा व्हेरियंटमध्ये हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प, कीलेस एंट्री अँड गो, ऑटोमॅटिक एसी, फॅब्रिक सीट अपहोल्स्ट्री, हिल होल्ड असिस्ट, ईएसपी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, ड्युअल एअरबॅग्ज आणि रिअर डीफॉगर यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. सध्या मारुती सुझुकी कंपनी १५ सीएनजी मॉडेल्स विकते. जेव्हा मारुती सुझुकी निर्मात्याने डिझेल इंजिनमधून पुढे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी सीएनजी पॉवरट्रेन वर जोर देण्यास सुरुवात केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे