मी आणि भगवान राम

श्रीरामपूर, जिथे माझा जन्म झाला आणि संगोपन झाले. माझी आजी पहाटे लवकर उठायची आणि राम मंदिरा मध्ये जायची. माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये देखील मी आजची बरोबर लवकर उठून देवळामध्ये जायचे. हे ऐकायला जेवढे सोपे वाटते तेवढे नव्हते कारण आम्ही सर्व जण मिळून २० मुल होतो. आजी सोबत देवळात जाण्यासाठी आम्हा सर्वांना पहाटे लवकर उठून पहाटे पहाटेच आंघोळ करावी लागत असे आणि आजी बरोबरच सकाळीच घर सोडावे लागत असे.

मंदिरामध्ये गेल्यानंतर माझी आजी तिच्या मैत्रिणींना भेटत असे. त्या सर्वजणी मिळून भजने गात असत, यानंतर आरती होत असे. आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटणे हे माझे आवडीचे काम होते. या सगळ्यांमध्ये मी एक गोष्ट नेहमी करायचे, माझ्या परीक्षा जवळ आल्या की परीक्षेला जाण्याआधी मी हातावर श्रीराम असे नाव लिहून जात असे असे मी दहावीपर्यंत न चुकता करत राहिले.

नंतरच्या काळामध्ये त्या मंदिराच्या संपर्कामध्ये व श्रीरामाच्या संपर्कामध्ये मी फार काळ राहिले नव्हते मग मी क्रॉसवर्ल्ड या दुकानातून रामायण विकत घेतले व ते वाचण्यास सुरुवात केली. तेव्हा वाचण्या मध्ये इतकी दंग झाले होते की रामायण मी कधी खाली ठेवलेच नसेल.

मी राम पात्राच्या प्रेमात पडले मला हे जाणवले की श्रीराम भूतलावरील सर्वश्रेष्ठ होते. कोणी व्यक्ती एवढा कसा चांगला असू शकतो याचे मला आश्चर्य वाटते. भारतीय श्रीरामाची पूजा करतात यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे नक्कीच नाही.

जेव्हा तुम्ही रामायण वाचत आहात तेव्हा तुम्हाला समजते की रामाने सीतेला का जाऊ दिले आणि हे करत असताना त्याला किती वेदना झाल्या. हे सर्व रामाने केले ते फक्त त्याच्या जनतेसाठी.

आजच्या या राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर सर्वच रामायण वाचतील अशी मला अपेक्षा आहे. या दिवसाची मी साक्षी आहे याचा देखील मला गर्व वाटतो आहे. जय श्रीराम

– डॉ अर्चना गोगटे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा