आमदार अमित गोरखे यांचा शपथविधी, सिल्लोडमध्ये जल्लोष

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर २९ जुलै २०२४ : भारतीय जनता पार्टीने दिलेल्या संधीमुळे अमित गोरखे यांनी विधान परिषदेचा सदस्य म्हणून शपथ घेतली, त्याप्रसंगी विधान परिषदेच्या अध्यक्ष सौ नीलिमाताई गोऱ्हे, नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य सौ पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, मिलिंद नार्वेकर आणि इतर सदस्य उपस्थित होते.

शपथ घेताना गोरखे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि भारताच्या संविधानाला स्मरण करून नमन केले. तसेच महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे त्यांनी आभार मानले. भाजपने विधानपरिषद सदस्य पदी अमित गोरखे यांना संधी दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तर्फे अध्यक्ष डॉ सचिन साबळे, पंडीत आव्हाड, पत्रकार अनिल साबळे, विशाल मिसाळ, प्रशांत साबळे, विजय आव्हाड, भगवान राऊत, ओंकार आव्हाड, संचालक मातोश्री गयाबाई साबळे सामाजिक प्रतिष्ठान,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंच तर्फे भाजपा नेते तसेच सर्व कमिटी चे आभार मानण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : सचिन साबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा