नवी दिल्ली, ११ ऑक्टोंबर २०२०: एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. ओवेसी यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे ज्यात ते म्हणाले होते की, जगातील सर्वात जास्त समाधानी भारताचे मुस्लिम आहेत.
ओवैसी यांनी या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहे की, मोहन भागवत यांनी हे सांगू नये की देशातील मुस्लिम किती संतुष्ट आहेत. वास्तविक मोहन भागवत यांची विचारधारणा मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याची आहे.
महाराष्ट्रातील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं होतं की, जगातील कोणत्या देशातील मुस्लिम जर सर्वात जास्त असंतुष्ट असतील तर ते भारतातील आहेत. या मुलाखतीत ते पुढं म्हटले होते की, जगाच्या पाठीवर असा कोणता देश आहे की ज्या देशावर विदेशी धर्मातील लोकांनी सत्ता गाजवली होती आणि ती सत्ता संपल्यानंतर विदेशी धर्मातील लोक अजूनही त्या देशात अस्तित्वात आहेत? आपल्याच प्रश्नाला उत्तर देत ते पुढं म्हणाले होते की, होय असा देश आहे तो म्हणजे भारत. त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की, भारतावर या आधी मुस्लिम प्रशासकांनी सत्ता गाजवली होती आणि त्यानंतर देखील भारतामध्ये मुस्लिम अस्तित्वात आहेत.
भागवत यांच्या या विधानाची चांगलीच खबर घेत ओवैसी यांनी ट्विट केलं आहे की, “मुस्लिमांच्या आनंदाचं मोजमाप काय आहे? हेच की एक भागवत नावाचा व्यक्ती आम्हा मुस्लिम बांधवांना नेहमी हेच सांगत राहतो की या देशातील बहुसंख्यकांच्या प्रति किती कृतज्ञ राहिलं पाहिजे. आमच्या आनंदाचं मोजमाप हे सांगतं की या देशातील संविधाना प्रमाणं आम्हाला वागणूक दिली जाते का? तुम्ही आम्हाला हे नका सांगू की आम्ही किती खूष आहोत, हे सांगा की तुमची विचार धारणा मुस्लिम बांधवांना या देशात दुय्यम स्थान देण्याचा विचार करत आहे.”
ओबीसी म्हणाले की, भारतातील मुस्लिमांची प्रतिस्पर्धा जगातील इतर मुस्लिम कि ती खुश आहे त्याच्याशी तुलना करण्याची नाही तर आम्हाला केवळ आमचे संविधानिक अधिकार द्या. आम्हाला सुद्धा बहुसंख्यकां प्रमानेच वागणूक मिळाली पाहिजे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे