मोहित कंबोज सध्या जोशात, ट्विट मात्र वादात

9

मुंबई, २२ ऑगस्ट २०२२: भाजप नेते मोहित कंबोज सध्या जोशात सोशल मिडीयावर कार्यरत होताना दिसत आहे. त्यातही त्यांनी राष्ट्रवादी नेते आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच त्यांनी आता आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो या कंपनीबाबत ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी सोशल मिडियावरुन सांगितले आहे की, बारामती ऍग्रो या कंपनीचा मी स्वत: काळजीपूर्वक अभ्यास करत आहे. लवकरच मी याची शहानिशा करत आहे. त्याचबरोबर लवकरच मी सविस्तर तपशील मिडीयावर शेअर करेन, जेणे करुन सगळ्यांना या कंपनीची संपूर्ण माहिती समजू शकेल. अशा प्रकारचा तपशील मोहित कंबोज यांनी मिडीयावर टाकला.

यापूर्वीही मोहित कंबोज यांनी वादग्रस्त ट्विट केले होते. त्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करत त्यांच्या विरोधातले ट्विट सोशल मिडीयावर टाकले. जे अत्यंत गाजले. त्यांनी सांगितले होते की, भारतात आणि भारताबाहेरील लोकांच्या संपत्तीची चौकशी करणार. बेनामी कंपन्यांची चौकशी करणार. तसेच या नेत्यांच्या गर्लफ्रेंडच्या नावांची, त्यांच्या संपत्तीची चौकशी करणार. मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार. या नेत्यांच्या कुटूंबाची आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी करुन त्याची यादी सोशल मिडीयावर टाकणार.

या आधीचे त्यांचे ट्विट खळबळजनक होते. त्यात त्यांनी सांगितलं की, लवकरच राष्ट्रवादीचा एक नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटायला जाणार आहे. हे त्यांचे ट्विट गाजले.

बारामती ऍग्रोच्या ट्विटवर आमदार रोहित पवार यांनी सांगितलं की, मोहित कंबोज हे प्रसिद्धीसाठी सोशल मिडीयाचा वापर करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या ट्विटकडे लक्ष देऊ नका. असंही रोहित पवार यांनी सांगितलं.

एकुणातच मोहित कंबोज सोशल मिडीयावर जरा जास्तच जोशात असल्याचं दिसत आहे. पण त्यांचे ट्विट मात्र वादात असल्याचं दिसतयं. आता वाट पहायचीय मोहित कंबोज यांच्या नव्या ट्विटची. वेट अँण्ड वॉच ….

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा