“लग्न” न झालेल्यांना कोरोनाचा अधिक धोका….

पुणे, १६ डिसेंबर २०२०: “आता ज्याचं लग्नं झालं नाही ते पुढं ही तशेच रहातील दुसऱ्यांच्या लग्नात कसं बजाओ बांगो बांगो बांगो” इंदूरीकर महाराजांच्या कीर्तनात अविवाहित मुलांबद्दल केलेलं हे एक मिश्किल विधान तुम्ही कुठं ना कुठं नक्कीच ऐकलं असंल आणि त्याचा मनमुराद आनंद हि घेतला आसंल.

खरं तर हल्लीच्या काळात आजच्या मुलांना मुलगी मिळणं कठीण झालं आहे आणि त्यात तर या वर्षी कोरोना आणि लाॅकडाऊन’नं जणू अविवाहित मुलांचं आयुष्य एकटंच जगण्यावर शिक्कामोर्तब केला. तसा हा गमतीचा भाग बाजूला सारला तर एक धक्कादायक रिसर्च अविवाहित मुलांबद्दल समोर आले आहे.

संपूर्ण जगाला वेड लावलेल्या कोरोना व्हायरस हा हळूहळू नियंत्रणात जरी येत असला तरी धोका मात्र अजून ही टळलेला नाही. या संदर्भात जगभरात विविध देशांमधे रिसर्च स्टडी चालू असून, जे अविवाहित लोक आहेत किंवा राहण्याचा विचार करतायतं आश्यांना मुलीं आधी कोरोना भेटत आसल्याचं आभ्यासातून समोर आलं आहे.

विवाहिताच्या तुलनेत अविवाहित लोकांना कोरोनाचा अधिक धोका असून, विवाहितांच्या तुलनेत अविवाहितांना मृत्यूचा धोकाही अधिक ओढावतो, असं नव्या रिसर्च मधून समोर आलं आहे. अविवाहित असलेल्या लोकांची जीवनशैली याला कारणीभूत ठरली आहे.

अविवाहितांच्या लाईफ स्टाईल मुळं त्यांच्यामधे विवाहितांच्या तुलनेत रोगप्रतिकारक शक्ती कमी आसते. त्यामुळं त्यांना कोरोना विषाणुची बाधा होण्याची शक्यता जास्त असल्याचं यामधे सांगण्यात आलं. तर कोरोना बद्दल येणारे असे रिसर्च हे दिवसेंदिवस लोकांना बेचेन करणारेच आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा