गोल पोस्ट राजकारण मुख्यमंत्री, गृहमंत्रीपद देण्यास अमित शहा यांचा नकार

मुख्यमंत्री, गृहमंत्रीपद देण्यास अमित शहा यांचा नकार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली.या भेटी दरम्यान, दुष्काळाबाबत सविस्तरपणे चर्चा झाली. तसेच राज्यातील सत्ता समिकरणाविषयी देखील चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या चर्चेनंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद देण्यास अमित शहा यांनी स्पष्ट नकार दिला आहे. अशी माहिती आमच्या प्रतिनिधींकडून मिळत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनाचा सत्ता वाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याचे समोर येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version