मुंबई १४ फेब्रुवारी २०२५ : भारतामध्ये क्रिकेट या खेळला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्याचबरोबर लहणापासून ते प्रौढ व्यक्तिपर्यंत प्रत्येक व्यक्तीला क्रिकेट म्हंटल तर अंगात वेगळीच सळसळ भरते. काही मुले अगदी वयाच्या १० वर्षापासूनच क्रिकेटचं व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायला सुरुवात करतात. क्रिकेटच व्यावसायिक प्रशिक्षण शाळेत दिले जात नसल्याने काही मुलांना शाळा व क्रिकेट या दोन्ही गोष्टींवर लक्ष देता येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थांना क्रिकेटला प्रधान्य देता येत नाही. पण आता विद्यार्थ्यांना क्रिकेटला प्राधान्य देत आपल्या अभ्यासावर सुद्धा लक्ष देता येणार आहे. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी मोठे पाऊल उचलले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन ( Mumbai Cricket Association) आता लवकरच मुंबई विद्यापीठाच्या ( Mumbai Vidyapeeth) सहकार्याने असा पदवी अभ्यासक्रम बनवणार आहे. ज्यात मुलांना क्रिकेटचा अभ्यास करून पदवी घेता येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारणीची बैठक काल रात्री पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. ” क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला असून त्यासाठी अनेक क्षेत्रातून मदत मिळत असते. खेळपट्टी तयार करणे, व्हिडिओ विश्लेषक, पंच अशा विविध बाबींमध्ये विद्यार्थांना प्राविण्य मिळवता येणार आहे. यासाठी येत्या जून- जुलै महिन्यात या अभ्यासक्रमाचा प्रोग्राम रन करण्यात येणार आहे. ” असे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.
न्यूज अनकट : प्रथमेश पाटणकर