पाकिस्तानात महिला पत्रकाराची हत्या, पोलिस आरोपीच्या शोधात

तुर्बात – पाकिस्तान, ७ सप्टेंबर २०२० : टीव्ही होस्ट आणि सरकारी मालकीच्या ब्रॉडकास्टर पाकिस्तान टेलिव्हिजनची रिपोर्टर शाहीना शाहीन हिची वायव्य पश्चिमी शहर तुर्बात येथे तिच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तिच्या कुटूंबाने संशय व्यक्त केला आहे की हे “ऑनर किलिंग” चे प्रकरण असू शकते.

पाकिस्तानच्या वायव्य बलुचिस्तान प्रांतातील पोलिसांनी शनिवारी घरात हत्या झालेल्या महिला पत्रकाराच्या पतीला अटक करण्यासाठी शोध सुरू केला आहे.स्थानिक पोलिसांनी मयत पत्रकाराची ओळख शाहीना शाहीन अशी असल्याचे सांगितले.

याबाबत माध्यमांच्या वृत्तानुसार मिळालेली हकीकत अशी की, डॉक्टरांना तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करताच पळ काढलेल्या दोन व्यक्तींनी गंभीर जखमी अवस्थेत शाहीनला स्थानिक रुग्णालयात सोडले. नंतर पोलिसांना समजले की त्या पुरुषांपैकी एक पुरूष हा या महिलेचा पती, नवाबजादा महारब आहे.

रविवारी तुर्बत येथील या प्रकरणाचे तपास अधिकारी सिराज अहमद म्हणाले की, “आम्ही गुन्हा दाखल करून महिला पत्रकाराच्या मृत्यूचा शोध सुरू केला आहे,” मिळालेल्या माहितीनुसार शाहीनच्या कुटूंबियांनी तिच्या हत्येचा तिच्या पतीवर संशय व्यक्त केला असून या हत्येमागे कदाचित तो असू शकतो असा संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीनचे सहा महिन्यांपूर्वी कोर्ट मॅरेज झाले होते आणि ती आपल्या पतीसोबत राहत होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा