फुरसुंगी, दि. ३ जून २०२०: फुरसुंगी येथे ता.०२ जून रोजी मुसळधार पावसामुळे जम्प उडल्यामुळे व वायर शॉट झाल्यामुळे आणि तारा तुटल्यामुळे शहराच्या विविध भागांमधील वीजपुरवठा मंगळवारी रात्री खंडित झाला. रविवार पासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने देखभाल – दुरुस्तीची कामे करणे शक्य झाले नाही. त्यामुळे मंगळवारी वीज बंद ठेवण्यात आली नव्हती. मात्र, सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. फुरसुंगी, कदम वाकवस्ती, या परिसरात जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे वीजपुरवठ्याच्या यंत्रणेत बिगाड झाला.
जम्प तुटल्यामुळे व केबल शॉट झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत केबल टाकण्याचे व जम्प बदलण्याचे काम चालू होते, त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा सुमारे दहा तास खंडित झाला होता; दरम्यान, कदमवाक वस्ती, आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने काही झाडे पडली. तुटलेली झाडे बाजूला काढताना वीजवाहिन्या तुटून अपघात होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील वीजपुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला होता. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य अभियंता गजानन मोरे यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले.
तसेच पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या किरकोळ तक्रारींचे प्रमाणही वाढले होते. तसे असताना सुद्धा रात्रीच्या वेळेस मोठा पाऊस पडत असताना सुद्धा वायरमनने पहाणी करून तेथे जाऊन त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे