व्हॉएजर २ सोबत संपर्क साधण्यात नासाला यश, पृथ्वीपासून १८६६ कोटी कि.मी. दुर

वॉशिंग्टन, ४ नोव्हेंबर २०२०: नासानं ४३ वर्षापूर्वी प्रक्षेपित केलेल्या आपल्या एका स्पेसक्राफ्ट सोबत संपर्क साधण्यात यश मिळवलं आहे. व्हॉएजर २ असे या स्पेसक्राफ्टचं नाव आहे. ४३ वर्षापूर्वी नासानं सोडलेलं हे स्पेस क्राफ्ट किंवा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे १८६६ कोटी किलोमीटर लांब पोहोचलं आहे. जवळपास सात महिन्यापासून या उपग्रहाचा आणि नासा शी कोणताही संपर्क झाला नव्हता. मात्र, सात महिन्यानंतर पुन्हा एकदा नासा या उपग्रहाशी संपर्क साधण्यात यशस्वी झाली आहे.

वास्तविक, व्हॉएजर २ अंतराळ यानासोबत ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या विशेष रेडिओ ऐंटिनाद्वारेच संपर्क साधला जाऊ शकतो. पण, त्यामध्ये खराबी आल्यामुळं बऱ्याच काळापासून या उपग्रहाचा संपर्क साधला गेला नव्हता. व्हॉएजर २ उपग्रह एवढ्या लांब गेला आहे की, त्या सोबत संपर्क साधत असताना प्रतिसाद मिळण्यासाठी ३४ तासांची वाट पहावी लागते. खराब झालेल्या या रेडिओ अँटिनाची दुरुस्ती केल्या गेल्यानंतर या उपग्रहाला संदेश पाठवला गेला असता उपग्रहाकडून देखील त्याची प्रतिक्रिया आली… ‘हॅलो’.

व्हॉएजर २ उपग्रहाला नासानं २० ऑगस्ट १९७७ मध्ये प्रक्षेपित केलं होतं. हा उपग्रह प्रक्षेपित करण्या मागं नासाचं उद्दिष्ट हे होतं की, हा उपग्रह अंतराळ प्रवास करत असताना इतर ग्रहांचा अभ्यास केला जावा. ज्यासाठी हा उपग्रह नासाला अनेक छायाचित्र देखील पाठवत राहिला. याआधी देखील नासानं याच वर्गातील एक उपग्रह प्रक्षेपित केला होता. व्हॉएजर २ प्रक्षेपित करण्याच्या सोळा दिवस आधी नासानं व्हॉएजर १ प्रक्षेपित केला होता.

व्हॉएजर २ ही युरेनसपर्यंत पोहोचणारी प्रथम मानवी निर्मित वस्तू आहे. या उपग्रहाच्या संशोधना अंतर्गत युरेनसवर १० नवीन चंद्र सापडले. तसंच नेपच्यून पर्यंत पोहोचण्यात देखील यश आलं. यावेळी या उपग्रहानं नेपच्यूनच्या पाच नवीन उपग्रहांचा शोध लावला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमा

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा