नाशिक : विनाहेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई; ‘इतक्या’ रुपयांचा दंड वसूल

8

नाशिक, ६ डिसेंबर २०२२ नाशिक शहरात १ डिसेंबर पासून सुरू झालेल्या हेल्मेटसक्ती मोहिमेत कारवाईचा बडगा उगरण्यात आला. आतापर्यंत १,८०० पेक्षा अधिक दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. तर जवळपास साडे नऊ लाख पेक्षा अधिक रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात १ ते ५ डिसेंबर या कालावधीत १,८७६ दुचाकींवर कारवाई करण्यात आली असून ९ लाख ५६ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

नाशिकमधील हेल्मेट सक्तीची मोहीम पुन्हा जोर धरू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हेल्मेट सक्ती अनेक मोहीम राबविल्या. मात्र नाशिककरांचा रोष आणि अत्यल्प प्रतिसादामुळे मोहीम थंड पडल्या. मात्र, आता पुन्हा मोहिमेला सुरुवात झाली असून एक डिसेंबर पासून शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली.

  • इथे होत आहे तपासणी :

नाशिक पोलिसांकडून शहरातील चेकिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. आज (दि.०६.) शहरातील दिंडोरी नाका/ मालेगाव स्टॅन्ड/ खडकाळी सिग्नल/ सारडा सर्कल/ दत्त मंदिर/ एक्स्लो पॉईंट/ सिन्नर फाटा/ चेहडी नाका आदी परिसरात सकाळी ,११ :०० ते १३:०० आणि १६:०० ते १८:०० दरम्यान गाड्यांचे चेकिंग केले जाणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा