पुणे: मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात ताणाताणी झाल्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असून या पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज रविवारी तारीख १७ नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यात महाशिवआघाडीच्या मसुद्यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार काल पुण्यात आले. रविवारी दुपारी चारच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होईल.