इस्लामिक स्टेटच्या खोरासान मॉड्यूलवर ‘एनआयए’ची कारवाई; मध्यप्रदेश, महाराष्ट्रात ५ ठिकाणी छापे

6

पुणे, १३ मार्च २०२३ : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जागतिक दहशतवादी गट इस्लामिक स्टेटने भारतात आपल्या कारवाया वाढवण्याचा कट रचल्याचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील पाच ठिकाणी छापे टाकले . एका पोलिस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. फेडरल अँटी टेरर एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मध्य प्रदेशातील सिवनी येथे चार आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यातील एका ठिकाणी वेगवेगळ्या पथकांनी शोध घेतला. अधिकाऱ्याने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर ‘एनआयए’च्या पथकांनी इस्लामिक स्टेट – खोरासान प्रांत प्रकरणातील संशयित पुण्यातील तलहा खान आणि सिवनी येथील अक्रम खान यांच्या घरांची झडती घेतली.

दिल्लीच्या ओखला येथून काश्मिरी जोडप्याला (जहाँजैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग) अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सुरवातीला हा गुन्हा दाखल केला होता. हे जोडपे ‘आयएसकपी’शी संलग्न असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान अब्दुल्ला बाशीथ या आणखी एका आरोपीची भूमिका समोर आली आहे. ‘एनआयए’कडून तपास सुरू असलेल्या अन्य एका प्रकरणात तो आधीच तिहार तुरुंगात बंद होता.

शिवमोग्गा इस्लामिक स्टेट कट प्रकरणी ‘एनआयए’ने सिवनीमधील इतर तीन ठिकाणीही शोध घेतल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणांची झडती घेण्यात आली त्यात संशयित अब्दुल अजीज सलाफी आणि शोएब खान यांच्या निवासी आणि व्यावसायिक जागेचा समावेश आहे.

‘एनआयए’ने म्हटले आहे की, शिवमोग्गा प्रकरणात परदेशातून रचलेल्या कटाचा एक भाग म्हणून आरोपी – मोहम्मद शारिक, माझ मुनीर खान, यासीन आणि इतरांनी परदेशात त्यांच्या मालकांच्या आदेशानुसार, गोदामे, दारूची दुकाने, हार्डवेअरची दुकाने लुटली. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सलाफी सिओनी जामिया मशिदीत नमाज अदा करतात, तर २६ वर्षीय शोएब ऑटोमोबाईल पार्ट्स विकत होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा