दहशतवादी कारवायांच्या संशयावरून एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी

पुणे, ३ जुलै २०२३: महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनआयए दहशतवादी कारवायांच्या संशयावरून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापे टाकले. एनआयए ने २८ जून रोजी नागपाडा येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता जो आयएसआयएस च्या संपर्कात होता. अशा स्थितीत या प्रकरणातील संशय व ठोसपणा पाहता एनआयएकडून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

नागपाडा, मुंबई येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीवर आयएसआयएस च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यानंतर एनआयएला आणखी काही लोक इसिसच्या संपर्कात असल्याचा संशय आला आणि त्यानुसार एनआयए छापे टाकत आहे. एनआयएने मुंबई आणि भिवंडीमध्ये प्रत्येकी दोन आणि पुण्यातील एक असे पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. अशा परिस्थितीत आता पुरावे पुष्टी झाल्यानंतर एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात शोधमोहीम राबवली जात आहे. मुंबईतील नागपाडा पोलिस स्टेशनजवळ छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएच्या सूत्रांनी दावा केला आहे की संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती, ज्याची चौकशी आता सुरू आहे.

मुंबईशिवाय पुण्यातही एनआयए आणि आयबीचे छापे सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, एनआयए आणि आयबीच्या पथकाने कोंढवा येथे छापा टाकला असून याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयए आणि आयबीच्या पथकाने आज पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन परिसरातील वजीर कॅस्केड सोसायटीमध्ये छापा टाकला आहे. आता जुबेर शेख, वय ३९ वर्ष याला चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि आयबी यांनी संयुक्तरित्या छापा मारून ताब्यात घेतलं आहे. सध्या या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा