निर्मला सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प, राष्ट्रपतींनी पारंपरिक शुभेच्छा देत गोड क्षण साजरा केला!

7

नवी दिल्ली १ फेब्रुवारी २०२५ : देशभरातील जनतेचे लक्ष वेधून घेणारा केंद्रीय अर्थसंकल्प आज काही क्षणांतच संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करत आहेत.

सकाळीच अर्थमंत्री संसद भवनात दाखल झाल्या. तत्पूर्वी, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे अर्थसंकल्पाची अधिकृत प्रत सुपूर्द केली. यावेळी राष्ट्रपतींनी भारतीय परंपरेनुसार त्यांचे तोंड गोड करत दही-साखर भरवले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा गोड क्षण देशाच्या आर्थिक भविष्यासाठीही सकारात्मक संकेत देणारा ठरला.

दरम्यान, संसद भवनात नेत्यांची लगबग सुरू झाली असून, काही वेळातच पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक होणार आहे. यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाईल. या महत्त्वाच्या क्षणाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे!

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा