बीड, २९ जुलै २०२० : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० साठी पीक विमा भरण्यासाठी केवळ दोनच दिवसांचा कालावधी उरलेला आहे. या कारणास्तव, ज्या गावांची नावे पोर्टल वर तांत्रिक अडचणींमुळे दिसून येत नाहीत, त्या गावांची नावे पोर्टलमध्ये तात्काळ समाविष्ट करून घ्यावी. तसेच, एखाद्या शेतकऱ्याचे नाव जर पोर्टल वर दिसून येत नसेल तर त्यांचा पीक विमा बँकेने ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावा, असे आदेश ना. धनंजय मुंडे यांनी आज दिनांक २९ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्यासाठी केवळ दोनच दिवसांचा कालावधी उरला असल्याने, प्रशासन आणि बँकांनी शेतकऱ्यांना पुर्ण सहकार्य करावे. या सोबतच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून ते म्हणाले की, माझ्या जिल्ह्यातील एकही शेतकरी विमा लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी मी प्रयत्नशील राहील.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.