नोबेल पारितोषिकाची सुरुवात कधी झाली ?

नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. ‘सर अल्फ्रेड नोबेल’ यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी १९०१ पासून पुरस्कार दिला जातो.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नोबेल पुरस्कार घोषित केले जातात. १० डिसेंबर या मानवी हक्क दिनी शांततेचे नोबेल हे नॉर्वे मधील ओस्लो या शहरातून देण्यात येते तर उर्वरित क्षेत्रांतील नोबेल पुरस्कार स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे दिले जातात.

कोण होते आल्फ्रेड नोबेल?
सर आल्फ्रेड नोबेल या स्वीडिश शास्त्रज्ञाने डायनामाइट या स्फोटकाचा शोध १८६७ मध्ये लावला. अशा प्रकारचे बरेच शोध त्यांनी लावले.
यामधून मिळालेल्या पैशाचा हिस्सा त्यांनी एका ट्रस्टच्या नावे ठेवला व त्याच्या व्याजातून प्रतिवर्षी 5 क्षेत्रांत महत्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देण्यात यावेत, असे सुचवले.
१८९६ मध्ये अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाला. नोबेल फाउंडेशनची स्थापना २९ जून १९०० मध्ये झाली. सुरूवातीस एकूण ५ क्षेत्रांसाठी पुरस्कार दिला जात होता. मात्र १९६९ पासून ६ व्या अर्थशास्त्रविषयास नोबेल देण्यास सुरुवात झाली.

पुरस्कारांसाठी निवडलेले क्षेत्र :
साहित्य, शांतता, पदार्थ विज्ञान, रसायानशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र इ.

नामांकन व निवड
पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडून पात्र व्यक्तींना नावे सुचविण्याविषयी विनंतीपत्रे पाठविली जातात. त्यांनी संबंधित कागदपत्रांसह आपल्या शिफारशी 1 फेब्रुवारीच्या आत पाठवायच्या असतात.
शांततेच्या पारितोषिकासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या काही संसदीय व इतर संस्थांचे सभासद उमेदवारांची शिफारस करू शकतात.
उमेदवारांच्या नावाची शिफारस केवळ व्यक्तीलाच करता येते संस्थेला नाही, मात्र अनेक पात्र व्यक्ती संयुक्तपणे शिफारस करू शकतात.
१ फेब्रुवारीपासून नोबेल समित्यांचे काम सुरू होते व सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये समित्या आपल्या शिफारशी पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडे पाठवितात.
या संस्था १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करतात. नावे सुचविली जाण्यापासून ते अंतिम निर्णयापर्यंत होणारे वादविवाद, चर्चा, मतदान इत्यादी बाबतीत गुप्तता राखली जाते.
प्रत्येक पारितोषिक हे एक सुवर्णपदक, विजेत्याचे कार्य व त्या क्षेत्रातील अधिकार दर्शविणारी पत्रिका आणि काही द्रव्य (रक्कम) यांच्या रूपात दिले जाते. या सुवर्णपदकाच्या एका बाजूवर आल्फ्रेड नोबेल यांची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूवर त्या त्या क्षेत्राचे दर्शक चिन्ह असते.

विशेष
▪ शास्त्रज्ञ मेरी क्युरी या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यामध्ये संशोधनासाठी २ नोबेल मिळवलेल्या एकमेव व्यक्ती आहेत.

▪ उत्तर व्हियेतनामच्या लु डक थो याने शांतता प्रस्थापित न झाल्यामुळे जाहीर झालेले शांततेचे नोबेल नाकारले होते.

▪ नोबेल पुरस्कार मिळविणारी सगळ्यात लहान मानकरी म्हणून १७ वर्षांच्या मलालाची इतिहासात नोंद झाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा