आता पिंपरी चिंचवड शहरातच होणार कोविड १९ ची चाचणी

पुणे, दि.२मे २०२०: पिंपरी चिंचवड शहरात आता कोविड १९ ची चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना कोरोनाच्या चाचणीसाठी आता पुणे शहरात जाण्याची गरज नसल्याचे मत पालिका प्रशासनाने व्यक्त केले आहे.

पिंपरी आणि भोसरी हद्दीत असलेल्या NARI (नारी) म्हणजे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. केली जाणार आहे. आतापर्यंत यासाठी पालिका प्रशासनाने परवानगी दिली नव्हती.
मात्र पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी ही चाचणी शहरात करण्यासंदर्भात मोठा पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असल्याचे दिसत आहे.

संशयित रुग्णाचे अहवाल पुण्यातील NIV संस्थेकडे पाठवल्यानंतर अहवाल येण्यासाठी २० ते २२तासांहून अधिक वेळ लागत होता. त्यामुळे अशा व्यक्तींची देखरेख करण्यात यंत्रणेला अधिक कार्यरत राहावं लागायचं. तसेच तर आपला अहवाल निगेटिव्ह येतो की पॉझिटिव्ह याची संबधित व्यक्तीलाही चिंता रहायची. या सगळ्या गोष्टी आता सोप्या होणार आहेत.

आता ही चाचणी इथेच होणार असल्याने वैद्यकीय यंत्रणेवरील भार हलका होण्यास मदत होणार आहे. कोरोना बाधितांवर उपचाराची आणि शहरातील संशयित व्यक्तींच्या चाचण्या घेण्याच्या क्षमतेत वाढ होईल. त्याच बरोबर पुण्यातील NIV संस्थेवरील भारही काही प्रमाणात कमी होईल, असं मत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केलं आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा