गोल पोस्ट कृषी नुकसानीचे पंचनामे बुधवारपर्यंत करा

नुकसानीचे पंचनामे बुधवारपर्यंत करा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सतत चालू असलेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतजमिनी आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्याच्या कामांना गती देऊन येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत मिशन मोडमध्ये ते पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य सचिव अजय मेहता यांनी आज येथे दिली.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. जिल्हानिहाय कृषी क्षेत्राचे किती नुकसान झाले याची त्यांनी माहिती घेतली.

error: Content is protected !!
Exit mobile version