गोल पोस्ट राष्ट्रीय श्रीनगरमधील हल्ल्यात एक ठार तर ३५ जखमी

श्रीनगरमधील हल्ल्यात एक ठार तर ३५ जखमी

श्रीनगर: श्रीनगर येथील मौलाना आझाद रोडवरील मार्केट परिसरात दहशतवाद्यांनी काल केलेल्या हातबॉम्ब च्या हल्ल्यात एक जण ठार झाला आहे तर ३५ जण जखमी झाल्याची बातमी मिळाली आहे. दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली.
जखमेतील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी २६ ऑक्टोबर रोजी ही दहशतवाद्यांनी हात बॉम्बचा उपयोग करून हल्ला केला होता त्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सी आर पी एफ) सहा जवान जखमी झाले होते. श्रीनगर मधील करनगर भागात दहशतवाद्यांनी सी आर पी एफ चा पथकावर हल्ला केला होता.१२ ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांनी अशाप्रकारे हातबॉम्ब ने हल्ले केले होते त्या हल्ल्यात पाच मजूर जखमी झाले होते तसेच कुलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बिगर कश्मिरी असलेले पाच मजूर ठार तर एक मजूर गंभीर जखमी झाला होता.

error: Content is protected !!
Exit mobile version