Oarfish Sighting in Tamil Nadu 2025 (Doomsday Fish myth or scientific reality):
‘तमिळनाडूच्या किनाऱ्यावर सापडलेला फिश आणि नैसर्गिक आपत्तीचा इशारा.’
सोशियल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मोठा फिश सात माणसाने धरला आहे. ही पोस्ट व्हायरल झाली आणि सगळीकडे खळबळ उडाली. नुकतेच तमिळनाडूच्या किनाऱ्यावर एक असामान्य फिश सापडला, ज्याला ‘डूम्सडे फिश ‘ म्हणून ओळखले जाते. या फिशच नाव हे ओरफिश असून. हा खोल समुद्रात राहणारा फिश क्वचितच समुद्राच्या किनाऱ्यावर दिसतो आणि असे मानले जाते की हा फिश किनाऱ्यावर दिसला की नैसर्गिक आपत्ती येते आणि हाच फिश तमिळनाडूच्या किनाऱ्यावर दिसण्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. खरतर मे 2025 पासून या फिशचे चार वेळा दर्शन झाले आहे – एकदा भारतात आणि तीन वेळा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅलिफोर्नियामध्ये. यामुळे लोकांमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या भीतीने चिंता निर्माण झाली आहे. आज आपण पाहूया की हा फिश खरंच आपत्तीचा इशारा देतो का, की ही फक्त एक अफवा आहे!
ओरफिश म्हणजे काय?
ओरफिश हा एक लांब, रिबनसारखा फिश आहे जो समुद्राच्या 200 ते 1,000 मीटर खोलात राहतो. हा फिश 30 फुटांपेक्षा म्हणजे ९ मीटर, जास्त लांबीचा वाढू शकतो. हा फिश माणसांसाठी हानिकारक नाही आहे आणि तो प्रामुख्याने समुद्रातील लहान जीव जसे की प्लँक्टन आणि खेकडे खातो. पण त्याचा समुद्राच्या किनाऱ्यावर येणे ही दुर्मिळ घटना आहे.
जपानी लोककथेतील डूम्सडे फिश;
जपानमध्ये या फिशला ‘ र्यूगु नो त्सुकाई ’ म्हणतात, किंवा sea god’s palace messenger, असे म्हणतात. १७व्या शतकापासून जपानी लोककथांमध्ये असे मानले जाते की ओरफिश पाण्याच्या किनाऱ्यावर आला की येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा इशारा देतो, जसे की भूकंप किंवा सुनामी. ही श्रद्धा २०११ मध्ये अधिक दृढ झाली जेव्हा जपानमध्ये तोहोकु भूकंप आणि सुनामी येण्यापूर्वी अनेक ओरफिश किनाऱ्यावर सापडले. हा भूकंप ९.० रिश्टर स्केलचा होता आणि त्याने प्रचंड विध्वंस केला. या घटनेने डूम्सडे फिशच्या मिथला अधिक बळ मिळाले.
ओरफिश आणि नैसर्गिक आपत्ती रिअल किंवा मिथ?
जरी ओरफिश आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यातील संबंध लोकांमध्ये चर्चेचा विषय असला तरी, शास्त्रज्ञ याबाबत वेगवेगळी मत मांडत आहेत. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ओरफिश खोल समुद्रात भूकंपाच्या खड्ड्यांजवळ राहतात, त्यामुळे ते भूकंपाच्या सूक्ष्म हालचालींना संवेदनशील असू शकतात. या हालचालींमुळे ते पाण्याच्या किनाऱ्यावर येऊ शकतात. पण बहुतेक शास्त्रज्ञांचे मत आहे की, ओरफिश किनाऱ्यावर येण्याचे कारण भूकंप नसून समुद्रातील तापमान बदल्यामुळे किंवा बहुतेक वेळा फिशच्या आजार पणामुळे सुधा तो किनाऱ्यावर येतो.

२०१९ मध्ये बुलेटिन ऑफ द सिस्मॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका यांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, जपानमधील ओरफिशच्या दिसण्याचा आणि भूकंपाचा कोणताही थेट संबंध नाही. तरीही, काही योगायोगांनी लोकांची भीती वाढवली आहे. उदाहरणार्थ, ऑगस्ट 2017 मध्ये फिलिपिन्समध्ये दोन ओरफिश किनाऱ्यावर सापडले आणि त्यानंतर एका दिवसात ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचप्रमाणे, २०१३ मध्ये कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर दोन ओरफिश सापडले, पण त्यानंतर कोणतीही आपत्ती आली नाही. या घटना योगायोगच असू शकतात, कारण ओरफिश आणि आपत्ती यांच्यातील थेट संबंधाला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाहीये.
भारतातील ओरफिश भीतीचे कारण आहे का?
तमिळनाडूच्या किनाऱ्यावर ओरफिश सापडल्याने स्थानिकांमध्ये चिंता पसरली आहे. पण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे घाबरण्याचे कारण नाही. ओरफिशचा किनाऱ्यावर येण्याचा संबंध समुद्रातील पर्यावरणीय बदल किंवा फिशच्या शारीरिक अवस्थेशी असू शकतो. भारतात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, पण त्यानंतर कोणतीही मोठी आपत्ती आली नाही. त्यामुळे हा फिश दिसणे म्हणजे आपत्ती येणारच, असे मानणे चुकीचे आहे.
घाबरू नका, जागरूक राहा

जपानी लोककथांनी त्या फिशला sea god’s palace messenger बनवले असले तरी, शास्त्रीय पुरावे याला पाठिंबा देत नाहीत. आपण शास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे आणि अशा घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी जागरूक राहा आणि या सुंदर समुद्री जीवाबद्दल अधिक जाणून घ्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी; जुई काळे













































