एकेकाळी बॉल बॉय आणि आता दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळताना बेन स्टोक्स चा केला शिकार

8

दुबई, १५ ऑक्टोबर २०२०: आयपीएल २०२० च्या ३० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात दिल्ली संघाने मोठा बदल केला. हर्षल पटेलच्या जागी कल्याणचा मराठमोळा खेळाडू तुषार देशपांडे याला संधी दिली. काल झालेल्या सामन्यात तुषारने आयपीएल मध्ये पदार्पण केले. तुषार देशपांडे याची निवड ही बेस प्राईझ म्हणजेच २० लाख रुपये मध्ये करण्यात आली होती. सामन्याआधी तुषार म्हणाला त्याच्यासाठी हा सामना खूप खास आहे. तो सहा महिन्यानंतर गोलंदाजीसाठी उतरणार आहे. त्याने या सामन्यात बेन स्टोक्सचा विकेट घेत आणि शेवटचे षटक टाकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

मुंबईसाठी रणजी क्रिकेट खेळताना तुषारने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तुषारला गोलंदाज नव्हे तर फलंदाज व्हायचे होते. परंतु फलंदाजीची लांबच लांब रांग पाहून त्याने गोलंदाज व्हायचे ठरवले. आयपीएलच्या पहिल्या सीजन मध्ये तुषार हा मुंबई मध्ये बॉल बॉय होता. त्यावेळी तो अंडर १३ मध्ये होता.

तुषार हा मुंबईच्या कल्याण मध्ये राहणारा मराठमोळा क्रिकेटपटू आहे. तो लोकल ट्रेन मधून प्रवास करत शिवाजी पार्क जिमखाना मध्ये आला. अकॅडमीमध्ये येण्यापूर्वी त्याने लांबचा पल्ला गाठला होता. त्यामुळे तो थकला होता. त्याला फलंदाज व्हायचे होते परंतु लांब रांग पाहून तो गोलंदाजी मध्ये गेला आणि त्याचा प्रवास सुरू झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा