मनमाडमध्ये एक कोटींचे सोने जप्त, चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मनमाड, ४ जुलै २०२३: रेल्वेत चोरी करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त मोहिमेतून कोकण रेल्वे पोलिसांनी सोमवारी चार संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे एक कोटी रुपयांचे सोने व ५० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मधून संदीप भोसले (वय ४०), अक्षय चिनवाल (वय २८) यांना अटक करण्यात आली. अर्चना ऊर्फ आर्ची मोरे (वय ४२), धनपत बेड (वय ४४) यांना मुंबईतून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे २०२३ रोजी कोकणात, रेल्वे स्थानकावर गाडी क्रॉसिंगसाठी थांबलेली असताना, ४ कोटी रुपये किंमतीचे ७ किलो सोन्याच्या सोनसाखळ्या असलेल्या बॅगची चोरी करण्यात आली होती. संपत जैन यांच्याकडे काम करणाऱ्या अशोक आर यांनी या प्रकरणी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. कोकण रेल्वे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी पोलिस निरीक्षक सुनील गुडलर व सहकाऱ्यांच्या साथीने तपासाला सुरुवात केली.

दोन पथकांच्या सहाय्याने कर्नाटक व महाराष्ट्रात या प्रकरणी तपास करण्यात आला. कवठेमहांकाळ येथून संदिप भोसले व अक्षय चिनवल यांना ३० जून रोजी ताब्यात घेण्यात आले होते. संशयितांना अटक करुन कोकणात न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. चौकशी दरम्यान अर्चना मोरे हिचे नाव पुढे आले. सोन्याचे दागिने नक्की कधी येणार याची माहिती अर्चना मोरे यांनी संशयित संदीप भोसले व अक्षय चिनवल यांना दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा