नीरा येथे दोन मोटरसायकलची समोरा समोर धडक अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी

16

पुरंदर, २३ एप्रिल २०२४ : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे नीरा बारामती मार्गावर दोन मोटासायकलची समोरा समोर जोरदार धडक होऊन एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत.

बंटी सुरेश गमंडे, रा. आनंदनगर, निबुत असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून तुकाराम सुखदेव माने, तेजस राहुल शिंदे आणि इरफान आरिफ सय्यद रा. निंबुत, जि. पुणे हे जखमी झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे