OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत लीक, ब्रँडचा सर्वात स्वस्त फोन, जाणून घ्या फीचर्स

पुणे, 24 एप्रिल 2022: OnePlus भारतात दोन नवीन स्मार्टफोन OnePlus 10R आणि OnePlus Nord CE 2 Lite 5G लॉन्च करणार आहे. ब्रँड हे दोन्ही हँडसेट 28 एप्रिल रोजी भारतात लॉन्च करेल. या इव्हेंटमध्ये केवळ दोन स्मार्टफोनच नाही तर OnePlus Nord Buds देखील लॉन्च केले जातील.

लॉन्च इव्हेंटच्या आधी, OnePlus चा अफॉर्डेबल 5G स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत आणि इतर फीचर्स लीक झाली आहेत. या फोनमध्ये काय काय उपलब्ध असेल आणि त्याची किंमत किती असेल ते जाणून घेऊया.

OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत आणि सेल डेट लीक

Passionate Geekz च्या शेअर डिटेल्स नुसार, OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. कंपनी याला 19,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करेल. रिपोर्टनुसार, या फोनचा पहिला सेल भारतात 30 एप्रिलला होणार आहे.

लीक झालेल्या रिपोर्ट मध्ये दिलेले डिटेल्स किती अचूक आहेत याबद्दल कोणतीही माहिती नाही, परंतु OnePlus Nord CE 2 Lite 5G हा ब्रँडचा सर्वात स्वस्त फोन असू शकतो.

जर OnePlus Nord CE 2 Lite 5G या किमतीत लाँच केला गेला, तर हा ब्रँडच्या काही फोनपैकी एक असेल जो आतापर्यंत 20,000 रुपयांच्या खाली लॉन्च झाला आहे.

काय असू शकतात फीचर्स?

OnePlus Nord CE 2 Lite 5G ला 6.58-इंचाची FHD+ IPS LCD स्क्रीन मिळेल, जी 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जो 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह येईल. Android 12 वर आधारित ऑक्सिजन OS वर हँडसेट काम करेल.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP मेन लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळेल. फ्रंटमध्ये कंपनी 16MP सेल्फी कॅमेरा देऊ शकते. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग दिले जाऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा