छत्रपती संभाजीनगर – बजाजनगर येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थिनींनी विभागीय जुदो स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी बजावत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ नोव्हेंबर 2025 रोजी शहरातील क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत ऑर्किड ग्रुपच्या तीनही शाखांतील विद्यार्थिनींनी वयोगटानुसार उत्कृष्ठ कामगिरी केली.
सुवर्ण पदक विजेते खेळाडू :
- ऑर्किड इंग्लिश स्कूल – आराध्या जाधव व सुवर्ण दातरंगे (Under-14), गौरी पांचाल (Under-17)
- ऑर्किड टेक्नो स्कूल – संस्कृती चौधरी (Under-14), श्रुतकीर्ती खलाटे (Under-17)
- ऑर्किड ज्युनिअर कॉलेज – राजश्री चिकने व धनश्री चिकने (Under-19)
या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय जुदो स्पर्धेसाठी निवड झाली असून राज्य पातळीवरही हे विद्यार्थी सुवर्ण पदक मिळवतील, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.
ऑर्चिड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमधील विद्यार्थी केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्येही दमदार कामगिरी करत आहेत. NEET, JEE(Main/Advance), CA Foundation, NTSE, MTSE Scholarship, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा अशा विविध स्पर्धांमध्ये ऑर्किडच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
या भव्य यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद तसेच पालक यांनी सर्व विजेत्या विद्यार्थिनींना मन:पूर्वक अभिनंदन करीत पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी:गजानन राऊत
