पिंपरी चिंचवड , ८ जानेवारी २०२१ : पोलिसांना कायम फिट ठेवण्याचा हेतू असलेला ‘HEALTH365’ हा कार्यक्रम आज प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे संपन्न झाला.
GOQii यांच्या वतीने पोलिसांना स्मार्ट वॉचचे वाटप करण्यात आले. या वॉचमुळे शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके आणि रक्तदाब इ. आरोग्यविषयक माहिती मिळण्यास मदत होईल व पोलिसांना आरोग्याकडे नीट लक्ष देता येईल. पोलिसांचा फिटनेस रहावा यासाठी सायकलचेही वाटप करण्यात आले. ग्राम सुरक्षा दल पिंपरी चिंचवड (community policing) शुभारंभ करण्यात आला. व त्यातील स्वयंसेवकांना ओळखपत्रे यावेळी देण्यात आली.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या आव्हानामुळे पोलिसांवरील ताण वाढतो आहे. जबाबदारीचे भान आणि कामाप्रती समर्पण भावना पोलिसांमध्ये असल्याने ते कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.अजितदादा पवार, पिंपरी चिंचवडच्या महापौर मा.माई ढोरे, पोलीस आयुक्त मा.कृष्णप्रकाश, पिंपरी चिंचवड आयुक्त मा.श्रावण हर्डीकर, GOQii कंपनीचे मा.विशाल गोंडल उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे