राज्यात पुन्हा एकदा ऑक्सिजन गळतीची घटना, सुदैवानं मोठं नुकसान नाही

सातारा, ६ मे २०२१: राज्यात कोरोनामुळं अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. त्यात ऑक्सीजन चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्यानं मृत्यूच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सध्या पूर्ण देशभरातच ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. अशात राज्यातही वेगळी परिस्थिती नाही. राज्यसरकार ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी परराज्यातून देखील ऑक्सीजन मागवत आहे. पण अशात देखील ऑक्सीजन ची वाहतूक करत असताना टँकर मधून ऑक्सिजन गळतीच्या घटना समोर येत आहे. काल गुन्हा अशीच एक घटना समोर आली. सुदैवानं कालच्या घटनेत फारसं काही नुकसान झालेलं नसलं तरी ऑक्सिजनचा मोठा साठा वाया गेला आहे.

यापूर्वी देखील अशीच घटना घडली होती. नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकरद्वारे ऑक्सिजन रिफिल करताना उच्च दाबामुळे गॅस टाकी फुटून ऑक्सिजनची गळती झाली होती. त्यामुळे रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा अचानक थांबला होता. या दुर्घटनेत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला होता. एकीकडं राज्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे तर दुसरीकडं वारंवार अशा घटना समोर येताना दिसत आहे.

काय आहे घटना

पुणे-बंगळुरु महामार्गावर ऑक्सिजन टँकर लिक झाला आहे. हा टँकर कोल्हापुरच्या दिशेला जात होता. टँकरमध्ये जवळपास १० मेट्रिक टन ऑक्सिजन साठा असल्याची शक्यता आहे. साताऱ्यातील वाळेफाटा परिसरात हा ऑक्सिजन टँकर उभा करण्यात आला आहे. घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले आहेत. तसेच सातारा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. लिकेज बंद करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलं होतं. पण जवळपास अर्धा तास ते ४५ मिनिटं टँकरमधील लिकेज सुरु होतं. त्यानंतर प्रशासनाचं काम सुरु झालं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा