गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा पानिपतचे ‘सपना हैं’ गाणे रिलीज

पानिपतचे ‘सपना हैं’ गाणे रिलीज

मुंबई : बॉलिवूडमधील अष्टपैलू दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरची निर्मिती असलेल्या ‘पानिपत’ या चित्रपटाचे ‘सपना हैं सच है’ गाणे रिलीज करण्यात आले आहे.
मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले असून जावेद अख्तर यांनी गीताचे बोल लिहिले आहेत. अभय जोधपूरकर आणि श्रेया घोषाल यांनी हे गाणे स्वरबद्ध केले आहे.
पानिपतचं युद्ध आणि मराठ्यांचा पराक्रम यावर पानिपत चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. यामध्ये अर्जुन कपूर, क्रिती सेनन आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दरम्यान, पानिपत हा चित्रपट येत्या ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version