पॅरालिम्पिक: सुमित अंतिलने विक्रमी थ्रो सह जिंकले सुवर्ण पदक, भालाफेकमध्ये भारताचे तिसरे पदक

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट २०२१: भारताच्या भालाफेकपटूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे.  या स्पर्धेत सुमित अंतिलने भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे.  त्याने सोमवारी पुरुषांच्या (एफ ६४ श्रेणी) अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले.  सुमितच्या या विजयामुळे भारताच्या पदकांची संख्या ७ वर गेली आहे.
 सुमितने ६८.५५ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले.  सुमीत अंतिलचा हा थ्रो देखील एक वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे.  टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
 सुमितच्या आधी अवनी लाखेराने नेमबाजीत भारताला सुवर्ण मिळवून दिले.  तिने सोमवारी महिला आर -२ १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच १ मध्ये पहिले स्थान मिळवून सुवर्णपदक जिंकले.
 या सामन्यात सुमितने स्वतःचाच विक्रम मोडला आहे.  त्याने पहिल्या प्रयत्नात ६६.९५ मीटर थ्रो केला, जो विश्वविक्रम ठरला.  यानंतर, दुसऱ्या प्रयत्नात त्याने ६८.०८ मीटर फेकून स्वतःचा विक्रम मोडला.  सुमितने आपली कामगिरी आणखी सुधारली आणि पाचव्या प्रयत्नात ६८.५५ मीटर फेकून विश्वविक्रम केला.
 देवेंद्र झाझरिया आणि सुंदर सिंह यांनीही पदके जिंकली
याआधी सोमवारी देवेंद्र झाझारिया आणि सुंदरसिंग गुर्जर यांनीही भालाफेकमध्ये पदके जिंकली.  देवेंद्रने रौप्य आणि सुंदर सिंहने कांस्यपदक पटकावले.
 न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा