पतित पावन संघटनेचा नागरिकत्व कायद्याला पाठींबा

पुणे : संपुर्ण भारतभर नागरिकत्व दुरुस्ती कायदा व नागरिक दुरुस्ती विधेयक विरोधात आंदोलन, मोर्चे सुरु असताना पुण्यातील हिंदुत्ववादी संघटना असणारी पतित पावन संघटनेने रविवारी (दि.२२) रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायदा भारतासाठी कसा उपयुक्त आहे. तसेच ‘ एक भारतीय होण्याचा नात्याने आमचा या कायद्याला पुर्णपणे पाठिंबा आहे, असे सांगत रविवारी (दि.२२) रोजी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर , संध्याकाळी ५ वाजता जाहिर समर्थन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
हिन्दुत्व राष्ट्र संघटना एकत्रित येऊन रविवारी समर्थन सभे मध्ये देश के गद्दारोको गोली मारो सालो को ‘ असे नारे ही लोकांकडुन देण्यात आले. नागरिकत्व दूरुस्ती कायदा हा कसा देशासाठी उपयुक्त आहे याचे समर्थन या सभेमध्ये करण्यात आले.
‘ लोकांच्या मनामध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत गैरसमज पसरवला जातो आहे. आपण जर हिंदु राष्ट्रामध्ये रहात असू तर आपल्याला सिध्द करण्याची काय गरज आहे’ असे समर्थन सभेमध्ये करण्यात आले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा