पुणे : जर आपण वर्षाच्या अल्प कालावधीसाठी कोणत्याही संस्थेमध्ये आणि कारखान्यात काम केले तर आपण सदस्यत्व घेतल्यापासून १० वर्षांनंतर निवृत्ती वेतनास पात्र राहता. एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ)ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ईपीएफओच्या मते कर्मचारी पेन्शन योजनेत हंगामी कामगारही पेन्शनसाठी पात्र असणार आहेत.
एपीएफओने ट्विटरद्वारे सांगितले की, जर आपण यापैकी कोणत्याही करखाण्यात आणि संस्थेमध्ये वर्षातील काही काळ जरी काम केले असेल तर आपण सदस्यत्व घेतल्यापासून दहा वर्षेनंतर निवृत्तीवेतनास पात्र असाल.
ईपिएफओने असेही सांगितले की चहा, साखर, रबर, इंडिगो, ऑइल मिलिंग, प्रवनाकृत मीठ, ज्यूट कर्नल, रोसिन, क्रॉकरस, बर्फ, फळे, आईस्क्रीम उद्योग, तंबाखू, टायल, होजिअरी , फळांचे जतन,भाजीपाला, संवरक्षण, वेलची लागवड, मिरपूड, काफी फळबागा, चहा बाग या उद्योग आदि सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना याचा फायदा मिळणार आहे.
हंगामी कर्मचारी म्हणजे काय?
हंगामी कर्मचाऱ्यांची पात्रता म्हणजे आपण कोणत्याही ठिकाणी एका वर्षापेक्षा कमी वेळा काम केले असेल तर ते वर्ष पूर्ण मानले जाईल. २०१६ मध्ये एखड्या कर्मचाऱ्यने केवळ ४ महिने काम केले। ज्याचे योगदान एपीएफओमध्ये जमा झाले तर ते एक वर्षाचे मानले जाईल.अशाप्रकारे, पेन्शन मिळण्यासाठी , किमान १० वर्ष सदस्यता आवश्यक आहे.