पुणे, दि २ मे २०२० : बेबडओहोळ (ता. मावळ) येथे सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसोबत पवना नदीवर पोहायला गेलेले दोघेजण पाण्यात बुडाले आहेत. या बुडालेल्यापैकी एकाचा मृतदेह शोधण्यास यश आले असून दुसरा मृतदेह शोधण्याचे काम प्रश्नासनाकडून सुरू होते.
संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय ३२, रा. जवळ, मुळशी) व आर्यन दीपक आलम (वय १३, रा. बेबडओहोळ) अशी बुडालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष आणि त्याचा मित्र आपल्या नातेवाइकांकडे राहण्यासाठी आले होते. घरातील पाणी संपल्याने ते दोघे पोहण्यासाठी पवना नदीवर नातेवाईकांसह पोहायला गेले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग पथक लोणावळा आणि मारूंजी येथील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मंडळाचे अग्निशामक दल तसेच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोषचा मृतदेह लगेच सापडला. मात्र, आर्यनचा मृतदेह शोधण्यात यश आले नाही. रात्री उशिरापर्यंत हे शोध कार्य सुरू होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर