२१८ कोटी पेक्षा जास्त किंमतीचे अंमली पदार्थ खोपोली पोलिसांकडुन जप्त

खालापूर, रायगड १२ डिसेंबर २०२३ : खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढेकू गावाजवळ विनापरवाना चालवण्यात येत असलेल्या कारखान्यातुन १०७ कोटी ५० लाख रुपये किंमतीची प्रतिबंधीत एम डी पावडर पोलिसांनी जप्त केली होती. अटक केलेल्या आरोपीं कडुन होनाड येथील गोडावून मधून अजुन २१८ कोटी रुपये किंमतीची एम डी पावडर हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत खोपोली पोलिसांनी तिघांना अटक केली असून आरोपींनी काही अंमली पदार्थ परदेशात पाठवले असल्याचे आढळून आले आहे.

खोपोली पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा क्रमांक ३६४/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५चे कलम ८(C)सह कलम २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन व्यवस्थापकासह दोन जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

खोपोली पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता होनाड गावातील गोडावून मध्ये लपून ठेवलेला ७ ड्रम मधील एकूण १७४.५ किलो वजनाचा २१८ कोटी १२ लाख ५० हजार किंमतीचे (एम डी) अमली पदार्थ जप्त केले.

हा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग प्रवीण पवार, पोलीस अधिक्षक रायगड सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम पवार, यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्याचे तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सहायक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने, पोलीस हवालदार अभिजित व्हराबळे, सागर शेवते, प्रसाद पाटील, प्रशांत पाटील, प्रदीप कुंभार, संतोष रुपनवर, लिंबाजी शेंडगे, सतीश बांगर, प्रवीण भालेराव, प्रदीप खरात यांच्या पथकाने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा