प्लाजमा थेरेपी बेकायदेशीर: आयसीएमआर

नवी दिल्ली, २९ एप्रिल २०२० : कोरोनाचा फैलाव पूर्ण जगामध्ये झालेला आहे. अगदी जागतिक महासत्ता असलेल्या देशांमध्येसुद्धा कोरोनाने थैमान घातले आहे. विकसित देशांमध्येसुद्धा या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणे अशक्य झाले आहे. जानेवारीपासून सुरू झालेला हा थरार अजूनही चालूच आहे, परंतु तरीही यावर कोणतेही उपचार किंवा लस उपलब्ध झालेली नाही.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नंतर आता प्लाजमा थेरेपी विषयी चर्चा चालू आहे. परंतु हे थेरेपी कितपत योग्य आहे याविषयी आयसीएमआरने खुलासा केला आहे. प्लाझ्मा उपचारपद्धती सध्या बरीच चर्चेत असली तरी ती पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यामुळे करोना रुग्णाच्या जीवालाही धोका उद्भ वू शकतो, असा अतिशय स्पष्ट इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंगळवारी दिला.

प्लाजमा थेरेपी जरी मोठ्या प्रमाणावर पूर्ण जगामध्ये वापरली जात असली तरी कोरोनासाठी हा ठोस उपाय समजू नये असेही आयसीएमआर नी सांगितले. प्लाजमा थेरेपी हे केवळ पर्यायी उपचार पद्धत म्हणून वापरली जात आहे. यावर हा उपाय म्हणून वापरले जाऊ नये असे ही सांगण्यात आले. प्लाझ्मा थेरेपी चा निव्वळ प्रायोगिक स्तरावर उपयोग केला जात असून, ‘यूएसएफडीए’नेही त्याची एक प्रायोगिक पद्धती म्हणूनच दखल घेतली आहे.

‘जोपर्यत आयसीएमआर आपल्या अभ्यासातून निष्कर्ष काढत नाही आणि ठोस शास्त्रीय पुरावे प्रस्थापित होत नाहीत, तोपर्यंत या उपचार पद्धतीचा संशोधन किंवा प्रयोगाच्या उद्देशासाठीच वापर करावा लागेल,’ असे या संबंधात स्पष्ट करणे अत्यावश्यक असल्याचे मत आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा