पंतप्रधान मोदींचा आसाम दौरा संपन्न, पूर्वीच्या सरकारला टोमणे

दिल्ली, १५ एप्रिल २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाच्या समारोपाला हजेरी लावली.शुक्रवारी आसाम दौर्‍यावर त्यांनी सुमारे १४,३०० कोटी किमतीचा प्रकल्प आणि अनेक कामांची पायाभरणी केली. आसाममध्ये शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ईशान्येतील पहिले AIIMS गुवाहाटी आणि इतर तीन वैद्यकीय महाविद्यालये राष्ट्राला समर्पित केली. पुढे, त्यांनी पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) कार्ड वितरित करून आपके द्वार आयुष्मान मोहिमेची सुरुवात केली.

त्यानंतर गुवाहाटीमधील बसिष्ठा ते सरुसजाई असा मेगा रोड शो आयोजित केला होता. एवढेच नाही तर गुवाहाटी येथील सरूसजाई स्टेडियम येथे राज्याने “सर्वात मोठे बिहू नृत्य आणि सर्वात मोठ्या ढोल वादनाचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवले. बिहू नृत्यात ११,३०४ कलाकारांनी भाग घेतला, तर २,५४८ कलाकारांनी ढोल वादन सादरीकरणात भाग घेतला. सीएम सरमा यांना गिनीजकडून प्रमाणपत्र मिळाले. बोहाग बिहूच्या निमित्ताने ११,००० हून अधिक बिहू नर्तकांनी सादर केलेल्या मेगा बिहू नृत्याचे साक्षीदार होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तो व्हिडिओ शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पूर्वीचा सरकारला टोला –

गुवाहाटी येथे एका सार्वजनिक सभेत सभासदांना संबोधित करताना मोदी म्हणाले, “आजकाल एक नवीन घटना घडत आहे. गेल्या नऊ वर्षात देशात झालेल्या विकासाबाबत मी जेव्हा जेव्हा चर्चा करतो तेव्हा काही लोकांना खूप अस्वस्थ वाटते. त्यांची तक्रार असते की, अनेक दशके देशावर राज्य केले पण ते विकासाचे श्रेय का घेऊ शकत नाहीत.श्रेयाची भूक आणि नियम या कल्पनेचा देशावर नकारात्मक परिणाम झाला आहे. पूर्वीच्या सरकारांनी ईशान्येला “दूरचे ठिकाण मानले ज्यामुळे परकेपणाची भावना निर्माण झाली.

तर देशाच्या प्रगतीवर आनंद व्यक्त करत ते पुढे म्हणाले “इशान्येकडील लोक विकासाची सूत्रे स्वत:च्या हातात घेण्यासाठी पुढे आले आहेत आणि त्यांचा विकासाची वाटचाल करत आहेत.त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयात देखील उपस्थित राहून संबोधित केले. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्यात ते सहभागी झाले होते. २१ व्या शतकातील भारतीयांची “मजबूत आणि संवेदनशील न्यायव्यवस्था ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गुरुकिल्ली आहे”असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा