जालना शहरात डबलसीट फिरणाऱ्या बहाद्दरांवर पोलिसांची कारवाई

जालना , दि.२ जून २०२० : जालना शहरात लाॅकडाऊन काळात सर्रासपणे दुचाकीवरून डबलसीट फिरणाऱ्या बहाद्दरांवर पोलिसांनी आज ( मंगळवारी) कडक कारवाई केली. अनेक जणांना दुचाकीवरून बाहेर पडणे चांगलेच महागात पडले आहे. डबलसीट दिसणाऱ्या अनेक दुचाकी जप्त करुन त्यांच्यावर कारवायांचा धडाका पोलीसांनी लावला आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका दुचाकीवर एकाच व्यक्तीने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. तर तीन व चार चाकी वाहनांनी चालक व दोन प्रवासी अशी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.

मात्र, तरी अनेक नागरिकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२) रोजी सकाळी सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी आपल्या पथकासह शहरातील मामा चौक येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक दुचाकी जप्त केल्या आहेत.

या सर्व दुचाकी मालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असुन शहरातील तालुका जालना पोलीस ठाणे व कदिम पोलीस ठाणे हद्दीतही अशा प्रकारे कारवाया सुरु आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा