सिरम इन्स्टिट्यूटचे सी ई ओ पूनावाला दीर्घकाळासाठी गेले लंडनला

नवी दिल्ली, २ मे २०२१: भारत सध्या कोरोना साथीच्या संकटाशी लढा देत आहे.  अशा वेळी, देशासाठी लस तयार करणारी सर्वात प्रमुख कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांची लंडनला दीर्घकाळ राहण्यास जाण्याविषयी बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार शनिवारी त्यांनी यामागील कारण असे सांगितले आहे की, सध्या भारतात लसीची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. मात्र देशातील अनेक ठिकाणी लस उपलब्ध झाल्या नाहीत. यामुळे उत्पादनाबाबत मोठा दबाव निर्माण झाला आहे. या दबावा कारणास्तव त्यांनी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
  या आठवड्याच्या सुरूवातीला अदार पूनावाला म्हणाले की, भारतातील काही बलाढ्य लोकांकडून त्यांना सतत धमकावले जात आहे.  त्यानंतर लवकरच, भारत सरकारकडून त्यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा पुरविली गेली. पूनावाला यांनी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, भारतातील काही बलाढ्य लोकांकडून त्यांना धमकीचे फोन येत आहेत.  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देशातील कोरोना लस कोव्हीशील्ड ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेका कोविड -१९ लस तयार करत आहे.
अदार पूनावाला म्हणाले की, मी इथे (लंडन)  दीर्घकाळासाठी आलो आहे. कारण, मला पुन्हा त्या स्थितीत जायचे नाही. सर्व जबाबदारी माझ्या एकट्यावर आली आहे. मी एकटा आहे जबाबदारी पार पाडू शकत नाही. खास करून त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण आपल्या कामांमध्ये व्यस्त असतात परंतु असे असताना देखील तुम्हाला धमकीचे फोन येत राहतात. पूनावाला यांनी वृत्तपत्राला सांगितले की, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही ते लोक काय करण्याची तयारी करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा