दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांच्याकडून पुणे महानगरपालिकेला पीपीई किट भेट

पुणे, दि.१३ मे २०२० : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवकांसाठी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांनी सामाजिक बांधीलकीतून एक हजार पीपीई किट्सची भेट दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या “आरोग्य रक्षा सेवा अभियाना” साठी मोहनलाल यांनी ही मदत केली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोहनलाल यांच्या विश्वशांती फाऊंडेशनतर्फे ‘सांस्कृतिक वार्तापत्र’च्या व्यवस्थापिका सुनीता पेंढारकर यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे हे पीपीई किट्स सुपूर्द केले आहे.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे, जनकल्याण समितीचे पुण्यातील कार्यवाह अश्विनीकुमार उपाध्ये, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आदी उपस्थित होते.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर मोहनलाल चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवत आहेत. सध्या कोरोनाविरोधातील लढाईत अग्रेसर असलेल्या आरोग्य सेवकांसाठी पीपीई किट्सची गरज आहे. त्यामुळे मोहनलाल यांनी सामाजिक जाणीवेतून केलेल्या पीपीई किट्सच्या मदतीसाठी पुणेकर त्यांचे आभारी आहेत, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा