गोल पोस्ट महाराष्ट्र प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अनेकांच्या घराची स्वप्नपूर्ती

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अनेकांच्या घराची स्वप्नपूर्ती

प्रधानमंत्री आवास योजना;

Pradhan Mantri Awas Yojana Housing Allocation: प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अनेकांच्या घराची स्वप्नपूर्ती झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 480 स्वप्न निकेतन’ सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकासकामांचे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येथे केवळ ₹9 लाखांना परवडणाऱ्या दरात घरे प्राप्त झाली आहेत. कम्युनिटी हॉल, सोलर व्यवस्था, ऑटोमॅटिक लिफ्ट यासारख्या अनेक आधुनिक सुविधा याठिकाणी देण्यात आल्या आहेत. यावेळी अग्निशमन केंद्र, ट्री ट्रान्सप्लांटर मशीनचेही आज लोकार्पण करण्यात आले.यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

या योजनेअंतर्ग महाराष्ट्रातील अनेकांना एका वर्षात 30 लाख घरांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सुमारे 1.5 कोटी नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप सुरू असून, पट्टा मिळाल्यानंतर संबंधित व्यक्ती प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र ठरेल आणि त्याला पक्क्या घरासाठी निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.तसेच ते म्हणालेत कि 2023 मध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह ‘स्वप्न निकेतन’ प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. अवघ्या 2 वर्षांत गौरव अग्रवाल आणि त्यांच्या टीमने उच्च दर्जाच्या इमारतींची उभारणी केली आहे. याकरिता त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले .

तसेच याच कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, नागपूर महानगरपालिकेने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. ई-बस व मेट्रोच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 2.5 लाख आयुष्मान आरोग्य मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरकरिता 123 आयुष्मान आरोग्य मंदिर मंजूर झाले असून, त्यापैकी 83 नागपूर महानगरपालिकेने सुरु केली आहेत.

याशिवाय 27 आयुष्मान आरोग्य मंदिरांचे लोकार्पण झाले असून, त्यामाध्यमातून उत्तम आरोग्यसेवा प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका आयुक्तांना नागपूरच्या 6 ही मतदारसंघात प्रत्येकी किमान 1000 घरे उभारण्याचे निर्देश दिले. तसेच आयुष्मान आरोग्य मंदिरासाठी ‘सिग्नेचर बिल्डिंग मॉडेल’ तयार करण्याच्या सूचना केल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी; तनया रेडकर

error: Content is protected !!
Exit mobile version