नवी दिल्ली, १९ ऑगस्ट २०२०: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची तब्येत पूर्वीपेक्षा अजून खालावली आहे. याबाबतची माहिती बुधवारी दिल्लीस्थित आर्मी हॉस्पिटलने दिली. प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याची तक्रार आहे. त्यांच्यावर व्हेंटिलेटरच्या आधारावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर देखरेख करीत आहे.
प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील सैन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत गंभीर आहे. मंगळवारी लष्कराच्या संशोधन व संदर्भित रुग्णालयाने प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीत कोणताही बदल नसल्याचे सांगितले. तथापि, डॉक्टरांनी असेही म्हटले आहे की त्यांचे महत्त्वपूर्ण मापदंड स्थिर आहेत.
१० ऑगस्ट रोजी ८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दिल्ली कॅन्टमधील सैन्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली. प्रणव मुखर्जी यांचा कोरोना अहवाल उपचारादरम्यान सकारात्मक आला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी