लता मंगेशकर यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा…..

मुंबई; २१ जानेवारी २०२२; जगभर प्रसिद्ध असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.त्यांना कोरोनाची लागण झाली असून आयसीयुमध्ये त्यांच्या वर उपचार सुरु आहे.लता मंगेशकर या सध्या ९२ वर्षाच्या आहेत त्यामुळे त्यांच्या वर उपचार करणं देखील जास्त प्रभावीपणे शक्य होत नाहीये.डाॅ प्रतित समदानी आणि त्यांच्या बरोबर बेस्ट डाॅक्टरांची टिम सध्या लता दीदींवर उपचार करत आहेत.

लता मंगेशकर यांचे वय जास्त असल्यामुळे त्यांच्या तब्येती विषयी चुकीच्या आफवा समाज माध्यमातून पसरवण्यात येत आहे. मंगेशकर कुंटुबाच्या प्रवक्ता श्री निवासन अय्यर यांनी लता दीदींची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले आहे.तसेच सर्वांनी लता दीदी लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करायला त्यांनी सांगितले.

भारताची गानकोकीळा लता मंगेशकर यांना वयाच्या ९२ व्या वर्षी कोरोनाची लागण झाली.जशी लता दीदींची तब्येत खराब झाली हे जेव्हा देशात चाहत्यांना समजले तेव्हा होम हवन,पूजा,महापूजा,प्रार्थना सध्या करत आहेत.चाहत्यांची हि प्रार्थना फळो आणि लता मंगेशकर या लवकर बर्या होऊन घरी परतो….

न्यूज अन कट प्रतिनिधी ; निखिल जाधव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा