नांदेड जिल्ह्यात महावितरणकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे

नांदेड, दि.१० जून २०२० : महावितरणाच्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्व देखभाल दुरूस्तीची कामे सर्वत्र अंतीम टप्प्यात सुरू आहेत.

याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून एखाद्या गावात देखभाल दुरूस्तीची सर्व कामे एकाच दिवशी पुर्ण व्हावीत, या हेतूने नांदेड परिमंडळाच्या वतीने ‘एक गाव-एक दिवस’ हे विशेष अभियान भोकर व नांदेड ग्रामीण विभागातील तीन गावांमध्ये आज राबविण्यात आले.

ग्रामीण भागातील प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे, वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी परिमंडळाचे मुख्य अभियंता डी.व्ही.पडळकर यांच्या संकल्पनेतून अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या निर्देशानुसार एक गाव-एक दिवस या विशेष अभियानाची सुरवात करण्यात आली आहे.

भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन गोपुलवाड यांच्या सुचनेनुसार किनवट उपविभागातील बिलोरी या गावामधे उपकार्यकारी अभियंता परचाके यांनी देखभाल दुरूस्तीच्या प्रत्यक्ष कामास सुरवात केली.

भोकर विभागासोबतच नांदेड ग्रामीण विभागातील मुदखेड उपविभागातील सारेगाव या गावामधेही एक गाव-एक दिवस अभियान राबविण्यात आले. यासाठी कार्यकारी अभियंता श्याम दासकर व उपकार्यकारी अभियंता स्नेहा हंचाटे यांनी परिश्रम घेतले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा