तुळजापूर येथील पत्रकार परिषद

15

तुळजापूर, २१ ऑक्टोबर २०२०: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता तुळजापूर येथे त्यांनी या संबंधित पत्रकार परिषद घेतली.

नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतकरी बांधवांना दिलासा देऊन त्यांच्या पाठीशी शासन असून सर्वोतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, मी पूर आणि अतिवृष्टी ग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी बोललो आहे, त्यांची भेट घेतली आहे. या परिस्थितीत जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ते आम्ही नक्की करणार आहोत. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान हे फार मोठे आहे. मी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्या संदर्भात काम सुरू देखील झाले आहे. पंचनामे जवळपास झाले आहेत. त्यामुळे, फक्त विचार नाही पण प्रत्यक्षरित्या मोबदला कसा द्यावा ते आम्ही पाहतो आहेत.

याबाबत पुढील दोन-तीन दिवसात तुम्हाला समजेल. तसेच, विमा कंपन्यांशी सुद्धा आम्ही बोलून घेत आहोत. यासोबतच, केंद्राकडून जीएसटीची थकबाकी देखील येणे बाकी आहे. तो परतावाही लवकर मिळणे गरजेचे आहे. सवंग लोकप्रियतेसाठी टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही,
असे या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा