सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग येणार आमने सामने

मॉस्को, ६ ऑक्टोंबर २०२०: कोरोना काळात या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १२ वी ब्रिक्स समिट आयोजित केली जात आहे. १२ वी ब्रिक्स शिखर परिषद १७ नोव्हेंबरला आभासी पद्धतीनं होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एलएसीवरील भारत आणि चीन यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सीमा विवादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे प्रमुख भेटणार आहेत.

असं म्हटलं जात आहे की १७ नोव्हेंबरला एलएसीवरील तणावाच्या दरम्यान प्रथमच पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आमने-सामने असतील. तथापि, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोघांची भेट आभासी पद्धतीनं होईल.

यंदाच्या शिखर बैठकीत ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीचा विषय म्हणजे “जागतिक स्थिरता, सामायिक सुरक्षा आणि अभिनव विकासासाठी ब्रिक्स’चा सहभाग”. २०२० मध्ये रशियन ब्रिक्सच्या अध्यक्षपदाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ब्रिक्स देशांमधील बहुपक्षीय सहकार्यात योगदान देणं आणि आपल्या लोकांचं जीवनमान उंचावणं. यावर्षी पाच देशांनी मुख्य स्तंभांवर शांतता आणि सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि वित्त, सांस्कृतिक आणि लोकांच्यामध्ये आदान-प्रदान घनिष्ठ सामरिक भागीदारी सुरू ठेवली आहे.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे सल्लागार अँटोन कोबायाकोव्ह याबद्दल म्हणाले की, “कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रसारामुळं सध्याची जागतिक परिस्थिती चिंताजनक असतानाही २०२० मध्ये रशियाच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स उपक्रम अखंडितपणे आयोजित केला जाणार आहे.”

एलएसी वरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाईदल सज्ज

भारत आणि चीनच्या सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, भारतीय हवाई दलानेही चीनच्या प्रत्येक हालचालीचा प्रतिकार करण्यासाठी दक्षता वाढविली आहे. अशा परिस्थितीत सैन्य मागं घेणं किंवा सीमेवरील तणाव कमी करणं या दोन्ही मुद्द्यांपासून चीननं आपले हात मागे घेतले तर या परिस्थितीसाठी देखील भारत पूर्ण तयार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवाई दलानं सीमा भागात आपली कार्यक्षमता वाढविली आहे. लडाखजवळील चुमारच्या हेन्ली भागात हवाई दल जोरात तयारी करत आहे. यामध्ये, सध्याच्या अडचणींबरोबरच, हिवाळ्याच्या सर्व तयारीची चाचणी घेण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा