पुणे, २० जानेवारी २०२३ : ‘निर्मल वारी’अंतर्गत पर्यावरण जपणार्या दिंड्यांना त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे पारितोषिक वितरण करून सन्मान करण्यात आला. या उपक्रमाने दिंडीचे वारकरी भारावले.
पर्यावरणाला पूरक शिस्तप्रिय स्वच्छ सर्वेक्षण निर्मल वारी या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणार्या दिंड्यांचा सन्मान नगरपालिकेकडून करण्यात आला. पालिकेचे प्रशासक संजय जाधव यांच्या कल्पनेतून हे पारितोषिक वितरण झाले. निर्मल दिंडी उपक्रमात पर्यावरण संवर्धन, पर्यावरण- रक्षण, प्लास्टिक बंदी, पाण्याचा मर्यादित वापर, कचऱ्याचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन या तत्त्वावर त्र्यंबकेश्वर शहरातील आलेल्या एकूण पाचशे दिंड्यांचेच मूल्यांकन या तीन दिवसांमध्ये करण्यात आले.
स्पर्धेत उत्कृष्ट पाच दिंड्यांची पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. सदर पारितोषीक विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व दिंडी उपयोगी साहित्य साहित्य वितरित करण्यात आले.
प्रथम पारितोषिक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व साऊंड सिस्टीम कृष्णाई प्रतिष्ठान पायी दिंडी सोहळा, जायखेडा, सटाणा, जि. नाशिक.
द्वितीय पारितोषिक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शेगडी व थर्मास भव्य पायी दिंडी सोहळा, धोडप किल्ला, चांदवड, जि. नाशिक.
तृृतीय पारितोषिक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पायी दिंडी सोहळा, ता. सिन्नर, जि. नाशिक, श्रीक्षेत्र शिखर बाळेश्वर पायी दिंडी सोहळा, बाळेश्वर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, संत जनार्दन स्वामी पायी दिंडी दीक्षी यांना देण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव, निर्मल वारी अभियानाचे अध्यक्ष भरत केळकर, यात्रा नियोजन दक्षता समिती अध्यक्ष पुरुषोत्तम लोहगांवकर, त्रिवेणी तुंगार, समिती सदस्य कैलास चोथे, समाजसेवक दिलीप पवार, सुनील लोहगावकर, अधिकारी पायल महाले, अभिजित इनामदार, राहुल शिंदे, पंकज शिंपी, अनिता गुंजाळ, नितीन शिंदे, संजय लगड, अमोल दोंदे इ. अधिकारी; तसेच कर्मचारी उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त मानकऱ्यांतर्फे पाटोळे रामनगर आटकवडे, पायी दिंडी सोहळ्याचे आयोजक संपत कराड यांनी मनोगत व्यक्त करीत आभार मानले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील











































