हिवाळ्यात त्वचेला जपा

पुणे, ३ नोव्हेंबर, २०२२ : त्वचा हा शरीराचा एक मह्त्वाचा घटक. पण हिवाळ्यात त्वचेची जरा इतर ऋतुंपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हिवाळ्यात वातावरणातील आद्रता कमी होते. त्यामुळे त्वचा जास्त प्रमाणात कोरडी पडते. त्यामुळे त्वचेला थंडीत जास्त प्रमाणात जपावे लागते.

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी, यासाठी काही महत्वाच्या टिप्स
१. हिवाळ्यात सगळ्यात जास्त प्रमाणात पाणी प्या. दिवसाला कमीत कमी १६ ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील आद्रता टिकून रहाण्यास मदत होते.
२. रोज दिवसातून तीन वेळा त्वचेला मॉईश्चरायझर लावणे गरजेचे आहे.
३. बाहेर जाताना सनस्क्रीन गरजेचे आणि आवश्यक आहे.
४. क्लींझरऐवजी टोनरचा वापर करावा.
५. हिवाळ्यात आपण लोकरी कपड्यांचा जास्त वापर करतो. पण त्यामुळे त्वचेला संपूर्ण पोषण मिळत नाही. कारण लोकर ही प्राण्यांच्या कातड्यांपासून केली जाते. यासाठी रात्री झोपताना किमान सुती कपड्यांचा वापर करावा.
६. हिवाळ्यात किंवा सर्वच ऋतूंमध्ये योग्य आहार घ्यावा. आहारात तेल, तूप, मांस आणि मासे याचा जास्त वापर असावा. ज्यामुळे त्वचेला योग्य वंगण मिळते.
७. हिवाळ्यात ओठ फुटण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यासाठी लीप बाम किंवा तूप यांसारख्या गोष्टींचा ओठांसाठी वापर करण्यास विसरु नका.
८. उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यात दोन वेळा अंघोळ करणे, शक्यतो टाळावे. त्यामुळे त्वचेवरचा थर निघून जातो. त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याची आणि त्वचेला इजा होण्याची शक्यता जास्त असते.
९. हिवाळ्यात जास्तीत जास्त कोरफडीचा वापर करावा. त्यामुळे त्वचा मुलायम रहाण्यास मदत होते.

या सर्व गोष्टींची वेळोवेळी काळजी घेतल्यास त्वचा नक्कीच मऊ, मुलायम आणि सुरक्षित राहू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा