मुंबई, 4 जुलै 2022: शिंदे गटाने आज बहुमत सिद्ध करावं, यासाठी आज चढाओढ होणार होती. पण शिंदे भाजप गटाने 164 मताने अखेर बहुमत मिळवून महाविकास आघाडीला पराभूत केले. मविआला केवळ 99 मते मिळाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. एकनाथ शिंदे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रभाव आहे. एकनाथ शिेंदे हे कट्टर शिवसैनिक असून अनेकदा त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोग्य खाते मिळाल्यानंतरही त्यांनी काम केलं. आनंद दिघे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार त्यांनी सर्वसामांन्यांसाठी काम केलं.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी मविआतल्या त्रुटी बोलून दाखवल्या. जनतेच्या कामासाठी त्यांनी 24 तास काम केलं. ज्या व्यक्तीसाठी पद महत्त्वाचे नसतं, त्यांना कर्तृत्व महत्त्वाचे असतं. मविआमध्ये असताना त्यांचा आवाज दाबला होता. आता अखेरीस त्यांची जीत झाली. आता संधी मिळाल्यावर अखेर ते समाजासाठी उभे राहिले आहेत. पण आता त्यांच्याकडून खूप मोठ्या कामांची अपेक्षा आहे. असं म्हणत आज फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा जाहीर केला. आता खरा कोण आणि खोटा कोण हे काळच ठरवेल. सच्चा कार्यकर्ता की खरा मुख्यमंत्री हे आता केवळ वेळ, नागरिक आणि कामच ठरवेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस